पुणे दिनांक ३१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उद्या १ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडी च्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात येणार आहे. असे महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले होते.मात्र या आंदोलना साठी मुंबईच्या पोलिसांनी 👮 परवानगी दिली नाही. तर महाविकास आघाडीचे नेते उद्याच्या आंदोलनावर ठाम आहेत.दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी हे मुंबईतील जेष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.यावेळी उद्याचे जोडेमारो आंदोलन स्थगित करण्यात यावे अशी विनंती पवार यांना वरिष्ठ अधिकारी यांनी यावेळी करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान आता यावर पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.