Home Breaking News हार्बर लाईनवर लोकल २० ते २५ मिनिटांनी धावत आहेत लोकलसेवा विस्कळीत प्रवाशांचे...

हार्बर लाईनवर लोकल २० ते २५ मिनिटांनी धावत आहेत लोकलसेवा विस्कळीत प्रवाशांचे प्रचंड हाल

52
0

पुणे दिनांक ३१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज सकाळीच मुंबईतील हार्बर लाईनवरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे.दरम्यान या मार्गावरील लोकल सेवा तब्बल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. दरम्यान सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना याचा प्रचंड त्रास होत आहे. याबाबत रेल्वे सूत्रांकडून माहिती मिळाली की मानखुर्द ते वाशी दरम्यान ओव्हरहेड वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही लोकलसेवेची वाहतूक कोलमडली आहे.तर परिणामी लोकल २० ते २५ मिनिटांनी उशिरा धावत आहेत.तसेच अनेक रेल्वे स्टेशनवर काही लोकल थांबविण्यात आल्या आहेत.

दरम्यान मुंबईतील हार्बर मार्गावरील मानखुर्द ते वाशी स्टेशन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने CSMT च्या रेल्वे ट्रेन वाशी पर्यत सोडल्या जात आहे.व तेथूनच परत माघारी पनवेलच्या दिशेने सोडल्या जात आहेत. दरम्यान त्यामुळे CSMT कडे जाणा-या प्रवाशांना ठाण्यावरुन प्रवास करावा लागत आहे.दरम्यान सकाळच्या वेळीच रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने यांचा त्रास कामावर जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे.त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.दरम्यान  मानखुर्द ते वाशी स्टेशन दरम्यान तुटलेल्या ओव्हरहेड इक्विपमेंट OHE मुळे लोकलसेवेत व्यत्यय येत आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे. या करीता रेल्वे प्रशासनाकडून गैरसोयी बद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान रेल्वेच्या या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.काही जणांना कामावर जाण्यासाठी उशीर होत आहे तर काही विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजला पोहोचायला उशीर होत आहे . त्यामुळे एकंदरीत सर्वच प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणावर रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे वैतागला आहे.

Previous articleमराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आज मालवण दौ-यावर
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आरोपी चेतन पाटीलला ५ दिवसांची पोलिस कस्टडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here