Home Breaking News हिंगोलीत ढगफुटी सदृश्य मुसाळधार पाऊस पुरात ९ जण अडकले,बचाव पथकासह हेलिकॉप्टरला पाणारण.उपजिल्हाधिकारीचे...

हिंगोलीत ढगफुटी सदृश्य मुसाळधार पाऊस पुरात ९ जण अडकले,बचाव पथकासह हेलिकॉप्टरला पाणारण.उपजिल्हाधिकारीचे मंत्रालयाला साकडं

65
0

पुणे दिनांक १ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) हिंगोलीत आज ढगफुटी सदृष्य पाऊस कोसळत आहे.दरम्यान मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर आला असून यात ९ जण अडकले आहेत.दरम्यान या गावात जिल्हास्तरीय पथक रवाना झाले आहे.येथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दरम्यान मुसाळधार पाऊसाने  व पूरामुळे गावातील लोक पूरात अडकले आहेत.त्यामुळे तातडीने हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी यांनी मुंबई मंत्रालयात  तातडीने ई – मेल करुन एसडीआर‌एफ ची टीम व हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.

दरम्यान आता हाती आलेल्या अपडेट नुसार काल मध्यरात्रीपासून हिंगोलीत मुसळधार पाऊस कोसळत आहे.आज तर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याने या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान या भागातील सावरखेडा येथे ४ औंढा येथे ३ तर हिंगोलीत ३ नागरिक हे पूराच्या पाण्यात अडकले आहेत.दरम्यान येथे जिल्ह्यातील बचाव पथक दाखल झाले आहे.पण पूर मोठ्या प्रमाणावर असल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आता येथे पूरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एसडी‌आर‌एफची टीम व हेलिकॉप्टरची गरज आहे.तसा ई- मेल मुंबई येथे मंत्रालयात करुन उपजिल्हाधिकारी यांनी मदत मागितली आहे.थोड्याच कालावधीत एसडीआर‌एफची टीम व हेलिकॉप्टरच हिंगोलीत घटनास्थळी दाखल होणार आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.दरम्यान हिंगोलीत पावसाने चांगलीच दाणादाण उडविली असून स्कूलबस देखील पाण्यात गेल्या आहेत.नदी .नाले.ओढे हे ओंसडून वाहत आहे.सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.तर काही नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

Previous articleबीड . हिंगोलीत व यवतमाळ मध्ये मुसाळधार पाऊस
Next articleपुण्यात वनराज आंदेकरवर गोळीबार व कोयत्याने हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here