पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सगळीकडे मोठ्या प्रमाणावर गाजत आहे.व तशी जाहिरात देखील मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्जच्या माध्यमातून होत आहे.मुंबई – पुणे महामार्गावरतर भल्ले मोठे होर्डिंग्ज तिन्ही पक्षाच्या वतीने लावण्यात आले आहे.त्यातच आता लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणा-या देवा भाऊंच्या होर्डिंग्ज वरुन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचं आता समोर आले आहे.दरम्यान सातारा शहरातील पोवई नाक्यावर लावण्यात आलेल्या होर्डिंग्ज वरुन अजितदादांचा फोटो गायब आहे.त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.