Home Breaking News अहमदनगरमध्ये भरदिवसा जेष्ठ नागरिकाची हत्या, पोलिस आयुक्त राकेश ओला निष्क्रिय अधिकारी दोन...

अहमदनगरमध्ये भरदिवसा जेष्ठ नागरिकाची हत्या, पोलिस आयुक्त राकेश ओला निष्क्रिय अधिकारी दोन नंबरच्या धंद्याचा महापूर यातूनच हत्या

88
0

पुणे दिनांक ८ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार एक खळबळजनक बातमी होती आली असून अहमदनगर हा जिल्हा दोन नंबरच्या धंद्यात पंढरी म्हणून अशी या जिल्ह्याची ओळख आहे.दरम्यान गणपती बाप्पाचे आगमन झाले आहेत.व आजच्या दिवशी जेष्ठ नागरिक यांची भरदिवसा राजश्री काॅलनीत असलेल्या कपिलेश्वर  येथे भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. दरम्यान हत्या झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव भानुदास मिसाळ ( वय ७१ ) असे आहे.तर या हल्ल्यात गंभीर रित्या जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव लहू सानप असं आहे.तर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव  अशोक घोलप असं आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच हा हल्ला झाला आहे.त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे.

दरम्यान या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलिस यंत्रणा हालवून आरोपीचा पाठलाग केला आहे.व हल्ला करण्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान‌ यावेळी आरोपींच्या घरी आनंद धाम येथे त्याच्या घरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा मिळाला आहे.यात‌ प्रामुख्याने धारदार कोयते व तलवारी अशी शस्त्रे मिळून आले आहेत.दरम्यान या खूनप्रकरणी पोलखोलनामाच्या टीमनी अहमदनगर पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या व अप्पर पोलिस आयुक्त प्रशांत खैरे यांच्या कार्यालयात दुरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कोणत्याही पोलिस कर्मचारी व अधिकारी यांनी फोन घेतला नाही.तसेच तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये देखील संपर्क केला व पोलिस आयुक्त व अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांचा भ्रमणध्वनी मागिताला असता त्यांनी देखील ‌उडवा उडवीचे उत्तरे दिली आहे.एकंदरीत यावरुन सिद्ध होते की यांना  मिडियाला ही बातमी न देता त्यांची निष्कार्यता लपवून ठेवायची होती हे आता धुतल्या तांदाळासारखे आहे.दरम्यान अहमदनगर येथे  दोन नंबरच्या धंद्याचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट सुरू आहे.याच वरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी याच मुद्यावरुन‌ अहमदनगर पोलिस आयुक्तालयासमोर आमरण उपोषण केले होते.तरी या जिल्ह्यात दोन नंबरच्या धंद्याचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट सुरू आहे. या जिल्ह्याचे पोलिस आयुक्त राकेश ओला यांचे देखील हात ✋ बरबटले आहेत.त्यामुळे शहरात दोन नंबर घ्या धंद्याचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट आहे. आणी याचाच परिणाम म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.दिवसाठवळ्या अहमदनगर जिल्ह्या मध्ये जेष्ठ नागरिकांच्या हत्या होत आहे.याला पोलिस खात्यच जबाबदार आहे. हे महायुतीचे सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील जबाबदारी आहे.

Previous articleभारतीय जनता पार्टीचे भोसरीचे आमदारांना जीव ठार मारण्याची धमकी.पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे निघाले धिंडवडे
Next articleभारतात पहिल्यांदाच आढळला मंकीपाॅक्सचा रुग्ण एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here