पुणे दिनांक २० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषणला सुरुवात केली आहे. त्यांचा उपोषणचा आज चौथा दिवस आहे.दरम्यान जरांगे पाटील यांची तब्येत आता चांगलीच खालावली आहे.त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी खालावली आहे.तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा आला आहे.तरी देखील तब्येतीची काळजी न करता ते उपोषणावर ठाम आहेत.त्यांच्या तब्येती बाबत जालना जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी आज मेडिकल बुलेटिन दिले आहे.दरम्यान महायुती सरकार ने तातडीने मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावे.तसेच हैदराबाद गॅझेट .बाॅम्बे गॅझेट व सातारा गॅझेट तातडीने लागू करण्यात यावे.तसेच मराठा समाजाच्यावर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे.अशी मागणी मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.