Home Breaking News आनंद दिघेंना मारलं गेलं -संजय शिरसाट,’शिरसाटांनी पुरावे द्यावे,मी कोर्टात जाईन’- केदार दिघे

आनंद दिघेंना मारलं गेलं -संजय शिरसाट,’शिरसाटांनी पुरावे द्यावे,मी कोर्टात जाईन’- केदार दिघे

58
0

पुणे दिनांक २८ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आनंद दिघेंना मारलं गेलं,हे संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहित आहे.असा आता गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाटांनी केला.ठाण्यातील ज्या रुग्णालयात दिघेंवर उपचार सुरू होते.ते रुग्णालया आता कायमचे बंद करण्यात आले आहे.? दिघेंना डिस्चार्ज दिला जाणार होता.पण त्यापूर्वीच त्यांचा अचानकपणे मृत्यू कसा झाला? असा सवाल करत आनंद दिघेंच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी बोलताना शिरसाटांनी केली आहे.

दरम्यान आता यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी असं म्हटलं आहे की.आमदार संजय शिरसाट यांनी पुरावे द्यावे.मी कोर्टात जायला तयार आहे.तसेच मंत्रीपदाची अपेक्षा असणा-या आमदार शिरसाटांना आता महामंडळ मिळालं म्हणून नैराश्यातून बोलत असतील. लोकांना संभ्रमात ठेवून निवडणुका आल्या की असे प्रश्न उपस्थित करायचे प्रयत्न सुरू आहेत.धर्मवीरमध्ये शेवटचा सीन होता ज्यात एकनाथ शिंदे खांद्यावर घेऊन जात आहेत.मग नेमका शिरसाटांचा रोख कोणाकडे आहे.? असेही केदार शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

Previous articleभीमा पाटस साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा,बोलू देत नाही म्हणून माइक फेकून दिला
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर तातडीने गुन्हा दाखल करा; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here