Home Breaking News मुंबईतील अटलसेतूवरुन एका व्यक्तीने समुद्रात घेतली चक्क उडी शोध मोहीम सुरू

मुंबईतील अटलसेतूवरुन एका व्यक्तीने समुद्रात घेतली चक्क उडी शोध मोहीम सुरू

87
0

पुणे दिनांक ३० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच मुंबईमधून एक खळबळजनक अपडेट हाती आली आहे.मुंब‌ईतील समुद्रमार्गे असले ल्या अटल सेतू वरुन एका ४० वर्षीय व्यक्तीने चक्क उडी घेतली आहे.दरम्यान या संबंधीत माहिती पोलिस यंत्रणांना मिळाल्यानंतर पोलिसांनी 👮 घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे.तसेच पोलिस यंत्रणा व अग्निशमन दलाच्या वतीने या व्यक्तीचा शोध समुद्रात घेतला जात आहे.दरम्यान सदरच्या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ४० वर्षीय व्यक्तीने सकाळच्या सुमारास अटल सेतू महामार्गावर त्याची कार पार्क केली.व समुद्रात उडी मारली आहे. दरम्यान या अटलसेतू महामार्गावर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.त्यानुसार वाहतूक पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज बघीतले असता सकाळी ९ वाजूऊ५७ मिनिटांनी संबंधित कार चालकाने समुद्रित उडी घेतल्याचे दिसून आले आहे. दरम्यान संबंधित कारच्या नंबर प्लेट वरुन संबंधित व्यक्ती कोण आहे.याचा शोध मुंबई पोलिस करत आहेत. व संबंधित व्यक्तीचा शोध आता सुरू आहे.

Previous articleपुण्यात आयटी अभियंता महिलेला ३कोटी ५६ लाख रुपयांचा सायबर भामट्यांकडून गंडा
Next articleसिंधुदुर्गात अंगरक्षक आणि उध्दव ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांच्यात तुफान राडा, शिवसैनिकांनी अंगरक्षकला चोपले अंगरक्षक गजाआड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here