Home Breaking News पुण्यात शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू

पुण्यात शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू

149
0

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. जुन्नर तालुक्यातील पिंपरी -पेंढार गावात बिबट्याने एका महिलेला ठार केले आहे. ठार झालेल्या महिलेचे नाव सुजाता ढेरे (वय ४० रा.जुन्नर जि.पुणे) असे आहे.मिळालेल्या माहितीनुसार सुजाता या शेतात काम करीत असताना बिबट्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला.यात त्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान जुन्नर तालुक्यात पिंपरी -पेंढार गावात व आसपासच्या भागात वनविभागाच्या वतीने ४० पिंजरे लावण्यात आले आहेत.तसेच ५० ठिकाणी कॅमेरा 📷 ट्रॅप्स लावण्यात आले आहे.तसेच बिबट्याचा शोध घेण्यासाठी थर्मल ड्रोनचा देखील वापर केला जात आहे.असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.दरम्यान मार्च २०२४ पासून आतापर्यंत बिबट्याचा हल्ल्यात एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे.अशी माहिती मिळत आहे.

Previous articleपुण्यात मिक्सर डंपरने कामांवर जाणाऱ्या युवतीला चिरडले घटनास्थळीच मृत्यू
Next article‘लाडकी बहीण योजनेची रक्कम ३हजार रुपये करणार’ मुख्यमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here