पुणे दिनांक ३१ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून अपडेट हाती आली असून.नांदगाव येथील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार सुहास कांदे यांना मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिल्याचा दावाच आमदार सुहास कांदे यांनी म्हटले आहे.ते असे देखील म्हणाले की तू बिनधास्त भिड संपूर्ण समाज तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे.दरम्यान सुहास कांदे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असून त्यांना नांदगाव या विधानसभा मतदारसंघातून महायुती मधून उमेदवारी देण्यात आली आहे.याच मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी अपक्ष अर्ज दाखल करुन बंडखोरी केली आहे.त्यामुळे या मतदार संघात महायुती मध्ये बिघाडी झाली असून या करिता भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात ३६ चा आकडा आहे.त्यामुळेच कांदे यांनी अंतरवली सराटीत दाखल होत जरांगे पाटील यांचा पाठिंबा नांदगाव विधानसभा मतदारसंघात मागितला आहे.दरम्यान या पाठिंबा बाबत मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की.आमचा निर्णय अजून व्हायचा आहे.असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे.
उ