पुणे दिनांक ९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून खळबळजनक अपडेट आली असून. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमाप्रश्नासंदर्भात आज सोमवारी बेळगावात महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.मात्र या मेळाव्याला कर्नाटक सरकारच्या वतीने कर्नाटक विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने मराठी भाषकांच्या या मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे.एवढेच नाही तर कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर बेळगावला येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांवर बंदी घातली आहे.तर या सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिस मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहे.तरी देखील बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळावा कसल्याही परिस्थितीत घेण्यावर ठाम आहे.तर महाराष्ट्रातील अनेक नेते हे आज बेळगावात जाणार आहेत.त्यामुळे आता बेळगावात सीमा वाद पेटण्याची शक्यता आहे.दरम्यान या संदर्भात महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या वतीने आता काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्वाचे आहे.