पुणे दिनांक ५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली खरी.आणि महायुतीचे सरकार देखील या योजने मुळेच पुन्हा एकदा बहुमताने महायुती सरकार सत्तेवर आले.असे महायुतीच्या नेतेमंडळींना वाटत आहे. दरम्यान राज्य सरकार विविध आर्थिक योजना खर्चाचा ताळमेळ न बघता करत आहेत.तसेच विशेष करून लाडकी बहीण योजनावर सरकार बराच खर्च करत आहे.मात्र या योजनेचा भार सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर पडत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान महायुतीच्या सरकारचा जमा आणि होणारा खर्च याच्यामध्ये ताळमेळ नाही.आता ठपकाच या महायुती सरकारवर ‘कॅग ‘ ने ठेवला आहे.दरम्यान ताळमेळ नसल्याने तिजोरीवर आर्थिक ताण येत आहे.असे देखील कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे.त्यामुळे राज्याची राजकोषीय तूट २ लाख कोटी वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान महिना संपत येताच आपण या महिन्याभरात किती खर्च झाला आणि पुढील महिन्यात किती पैसे वाचवायला हवे याचे गणित स्वतःच करतो ना.अगदी तसेच काम हे कॅग करत असते.हे सरकारच्या कामावर आणि खर्चावर नजर ठेवत असते.दरम्यान ‘ कंट्रोल अॅन्ड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ‘ म्हणजेच कॅग हे सरकारच्या खर्चाचा संपूर्ण हिशोब ठेवते व त्याचा रिपोर्ट जाहीर करते.सरकार तिजोरीतील पैशाचा गैरवापर करुन नये म्हणून यासाठी कॅग काम करत असते.