पुणे दिनांक ७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट आली असून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक ९ डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.दरम्यान आज भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या सोबत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देशमुख कुटुंबीयांनी घेतली आहे.यावेळी सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख.मुलगी वैभवी व पत्नी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबीयांनी आश्र्वासन दिले की. या खूनप्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही.यातील आरोपींना अशी शिक्षा देऊ की संपूर्ण महाराष्ट्राला एक उदाहरण भेटेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबीयांना आश्र्वासित केले आहे.अशी माहिती धनंजय देशमुख यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.