पुणे दिनांक १६ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता मुंबईवरून एक खळबळजनक अपडेट हाती येत असून बाॅलीवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या वांद्रेतील राहत्या घरी रात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.त्यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आले होते.दरम्यान सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले असून त्या आरोपीला आता थोड्याच वेळात वांद्रा पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात येणार आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.