पुणे दिनांक १९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून.वाल्मिक कराड याच्या जवळ १ हजार ते १ हजार ५०० कोटी रुपयां पेक्षा अधिक संपत्ती असल्याचा दावा मोठ्या प्रमाणा वर केला जात आहे.तसेच एसआयटीच्या वतीने त्याचे तीन मोबाईल जप्त केले आहेत . त्यातील एक सीमकार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याचा दावा केला जात आहे.त्याची मालमत्ता ही महाराष्ट्राच्या बाहेर अन्य देशामध्ये असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांची मालमत्ता ही सोलापूर पुणे तसेच पिंपरी-चिंचवड येथे त्याची दुसरी पत्नी व मुलांच्या नावावर आहे.आता या संपूर्ण प्रकरणात ईडीने लक्ष घालायला हवे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाच्या वतीने करण्यात आली आहे. वाल्मिक कराडने परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राची राख तसेच खंडणी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत अनेक कंपन्यांमध्ये असलेली भागीदारी या माध्यमातून अब्जावधीची संपत्ती जमावल्याची चर्चा आहे.त्यामुळे आता ईडी यात उडी घेऊन चौकशी करणार का ? तसेच महायुती मधील अनेक आमदार तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील वाल्मिक कराड यांची ईडीने चौकशी करावी अशी मागणी केली आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे.यानी तातडीने राजीनामा द्यावा अशी देखील मागणी आता जोर धरताना दिसत आहे.