पुणे दिनांक २८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट मुंबईतून आली असून.मुंबईत आज शिवसेना दोन्ही गटात चांगलाच वादविवाद झाला आहे.दरम्यान या बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उध्दव ठाकरे गटाचे राजुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.व शिंदे गटाला साथ दिली.व राजुल यांनी शिवसेना शाखेला टाळे ठोकले.यामुळे उध्दव ठाकरे गटाचे शिवसैनिक हे चांगलेच आक्रमक झाले.या कृत्याविरोधात शिवसेना माजी मंत्री अनिल परब हे रस्तावर उतरले यात ठाकरे गटाचे शेकडो शिवसैनिक या शाखेवर एकत्र जमा झाले.
दरम्यान ही घटना मुंबईतील जोगेश्वरी बेहराम बागे जवळ रात्रीच्या सुमारास शिवसेना शाखेसमोर हा हायव्होल्टेज ड्रामा घडला आहे.ठाकरे गटाचे राजुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.यानंतर उध्दव ठाकरे गटाच्या वतीने येथील शिवसेना शाखेवर दावा केला आहे.तसेच शिवसैनिकानी यावेळी पटेल यांच्या विरोधात घोषणा बाजी केली.दरम्यान यावेळी येथील शिवसेना शाखेला पोलिस छावणीचे स्वरूप आले.यावेळी दोन्ही गटाच्या वतीने येथील शाखेला टाळे ठोकण्यात आले आहे.