पुणे दिनांक ६ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.पुण्यात सुरू असलेल्या गुलियन बॅरे सिंड्रोमने (GBS) ने आता पुणेकर नागरिकांची धास्ती वाढवली आहे.दरम्यान आता आरोग्य विभाग चांगलाच सतर्क झाला आहे.याबाबत महत्वपूर्ण मिटींग पुणे महापालिकेत प्रशासन.तसेच एनआयव्ही व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे.सदरच्या बैठकीत एनआयव्हीने केलेल्या तपासणीत पुण्यातील व सिंहगड रोड वरील भागात असणाऱ्या दुषित पाण्यामुळे ह्या आजाराचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे.आता यावर उपाय म्हणून काही गावांमध्ये छोट्या स्वरूपाचा जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचा विचार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.दरम्यान दोन दिवसांपूर्वीच पुणे महानगरपालिके च्या वतीने सिंहगड रोड वरील पाण्याच्या आरो प्लॅन्ट वर कारवाई करण्यात आली आहे .