पुणे दिनांक २२ फेब्रुवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही सिंधुदुर्ग येथून आली असून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली मध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील एकूण ५ पर्यटक तेथील समुद्रात बुडाल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान या दुर्घटना मध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य ३ जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे.हे ५ पर्यटक हे हडपसर येथील आहेत.
दरम्यान समुद्रात बुडालेल्या पर्यटका पैकी १) शुभम सोनवणे २) रोहित कोळी या दोन जणांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य तीन जणांना वाचविण्यात यश आले आहे.पण त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.