पुणे दिनांक १६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) खोक्या भोसलेचे घर पाडणे व जाळणे यावर आता आमदार सुरेश धस यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.खोक्या भोसलेंचे घर पाडण्यासाठी घाईच करण्यात आली, आपण या संदर्भात वनविभाग व जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करणार आहे.असे धस यांनी म्हटले आहे.दरम्यान खोक्या भोसलेचे वन विभागाच्या जागेवर घर होते असं म्हटलं जात होतं आहे.पण वनपट्ट्याच्या जमिनीचं वाटप झालं होतं अशी देखील माहिती समोर येत आहे.असे देखील ते म्हणाले आहेत.
दरम्यान आष्टीचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस हे खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.दरम्यान धस यांची शिरुर कासार येथे आम सभा पार पडल्यानंतर या सभेनंतर खोक्याच्या कुटुंबीयांना झालेल्या मारहाणीबाबत माहिती घेणार आहेत.दरम्यान वन विभागाच्या वतीने खोक्या भोसलेचे घर पाडल्यानंतर काही अज्ञातांनी खोक्याच्या घराला 🔥 आग लावली व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी 👮 अज्ञात २० ते २५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.