पुणे दिनांक २० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळजनक अपडेट आली असून.पुणे येथे एका हत्या प्रकरणातील गुन्हेगारास अप्रत्यक्षरित्या मदत केल्याने पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडकेंना निलंबित करण्यात आले आहे.याबाबत अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी आदेश काढला आहे.दरम्यान यातील घोडके हे लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कार्यरत होते.दरम्यान लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या थेऊर येथे डोक्यात दगड घालून एक महिलेचा खून करण्यात आला होता.दरम्यान यावेळी घटना घडली तेव्हा तेव्हा आरोपी भरत जैद हा घटनास्थळीच उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले.पण जैद हा घटनास्थळीच उपस्थित असल्याचे पुरावे आढळले आहेत.त्यामुळे PSI अमोल घोडकेंना निलंबित करण्यात आले आहे.